मित्रांनो आज या ब्लॉग मध्ये आपण मासिक पाळी बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच मासिक पाळी का आणि केव्हा येते?? तसेच मासिक पाळी काल आणि आज काय स्थिती आहे या बद्दल अधिक माहिती आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत .
मासिक पाळी ...... महिलांनो ऐकून थोडं लाजिरवाण वाटलं का???...वाटणारच कारण सध्याची स्थिती अशीच आहे. माणसाने किती ही प्रगती केली , तरी तो महिलेला मागेच टाकत आला आहे. आपण किती ही विज्ञानयुगात जगत असलो , तरी ही काही अश्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीत आपण फार काही पुढे गेलो नाहीये. त्यातूनच एक म्हणजे मासिक पाळी येणे. तसं म्हणायला गेलं तर ही महिलांना होणारी शारीरिक क्रिया आहे. परंतु ही क्रिया भारतीय महिलांसोबत होणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे बर का... कारण असं, तर त्या महिलेला काही नियम आणि अटी लागू होतात .
मासिक पाळी का आणि केव्हा येते???
प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नेहमी उद्भवत असतो. की, मासिक पाळी का आणि केव्हा येते. जेव्हा एक स्त्री तारुण्यात पदार्पण करते . तेव्हा तिचे शरीर खूप वेगाने परिपक्व होते. आणि शरीरात खूप बदल येतात. प्रमुख शारीरिक विकास म्हणजे स्तनांचा विकास , जन नांगावर लव येणे, इत्यादी होय...प्रत्येक मुलीची मासिकपाळी ह्या काळात सुरू होते. तथापि ती सुरू होण्याच्या कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो.
प्रत्येक महिन्याला स्त्रीचे शरीर गर्भ धारणे करिता गर्भाशयाला तयार करीत असते. ह्या प्रक्रियेदरम्यान गर्भाशयात स्त्री बिजाच्या रोपणा साठी पेशी आणि रक्ताचे आवरण तयार होत असते. मासिक पाळी दरम्यान हे आवरण गळून पडते. आणि गर्भाशयाला मुखातून योनी मार्गा द्वारे हे आवरण शरीरातून बाहेर पडते. ह्या कालावधीत तिच्या शरीरातून रक्त आणि उतक ( टिशू) बाहेर पडतात. आणि ही क्रिया सरासरी ३-५ दिवसांपर्यंत सुरू राहते.
मासिक पाळी काल आणि आज...
स्त्री जन्माला येताच या शरीर क्रिया तिच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा होणारच असतात. पुरुष या वेदना कधीच समजू शकत नाही. तो फक्त पाहू शकतो . आपण किती तरी वर्षां अगोदरच्या गोष्टी केल्या तर सर्वांना आपोआप समजून जात असत. की या स्त्री का मासिक पाळी आली आहे. कारण, तिला वागणूक च तशी दिली जात असत. तिला एका वेगळ्या खोलीत ठेवले जात असत, देवपूजा आणि धार्मिक कार्यक्रम यांमध्ये तिला बंदी घातली जायची. अजूनही खूप वाईट .. पण जसं जसं काळ पुढे सरकत गेला तसे काही गोष्टींमध्ये बदल येत गेले. नवनवीन शोध लागतात तसे. मासिकपाळी मध्ये स्त्रियांना त्रास कमी होण्यासाठी किंवा एखादी लाजीरवाणी गोष्ट त्यांच्या सोबत घडू नये म्हणून ' सॅनिट्री पॅड ' ची निर्मिती करण्यात आली. आधीपासूनच महिला कापडाचा वापर करत आले आहे . त्यामुळे स्त्री ला शारीरिक वेदना होत असत. आणि बहुतांश वेळी ते आजाराला निमंत्रण देत असत.
हल्लीच्या काळात साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येकाला या गोष्टीचं ज्ञान आहे. आताची स्त्री सहजरीत्या सांगते . मला वेदना होत आहे, मला मासिक पली आली आहे. समोरचा व्यक्ती सहजरीत्या उत्तर देतो. " अच्छा ठीक आहे , काळजी घ्या... " सध्याच्या काळात शासनातर्फे वेगवेगळ्या योजना तसेच जनजागृती केली जाते. तसेच चित्रपटाच्या माध्यमातून संदेश दिला जातो उदा. " पॅडमॅन" असे चित्रपट जनजागृती करत आहेत. यामुळे सर्वांना या सर्व गोष्टी परिचित आहेत. काही लोक आहेत जे सर्व माहीत असून सुद्धा या गोष्टींची थट्टा करतात. त्या वेदना असलेल्या स्त्री ला त्रास देतात. हे कुठेतरी थांबायला हवं..
आताची स्त्री सुसंस्कृत आणि शिक्षित आहे. मासिकपाळी मुळेच आपण जन्माला येऊ शकतो ना..?? स्त्री ने ही शारीरिक वेदना आपली कमजोरी नव्हे तर ताकद म्हणून जगासमोर आणयला हवी...
ब्लॉग आवडल्यास कमेंट करून कळवा आणि शेअर नक्की करा ..
-Ankush Dhavre
2 Comments
very important information you have share,it's still necessity to create awareness for this.
ReplyDeleteNice article
ReplyDelete